(मित्रांनो प्रथमच लिहीत आहे, चूक भूल क्षमा असावी, व्याकरणा कडे कान-डोळा करावा)
मला पहिल्या पासूनच भारतीय रेल, तिचा इतिहास बद्दल खास असं आकर्षण आहे. २ दिवसांपूर्वी मला गोल्डन टेंपल मेल मधून प्रवास करण्याचा योग आला. ट्रेन हज्रत निजामुद्दिन स्टेशन मध्ये येतानाचं ते दृश्य पाहून मी तर इतिहासातच गेलो होतो.
१ सप्टें. १९२८ ला हि मेल सुरू झाली ... भारतातली त्या काळातली सर्वात लांब प्रवास करणारी ... मुंबई ते पेशावर.१९३० मध्ये लंडन टाईम्स ने भारतातली सर्वात प्रसिद्ध ट्रेन म्हणून गौरवलेली. पहिली ए. सी. गाडी. पहिली सर्वात जलद गाडी ... !
मी आपोआपच त्या इतिहासाचा साक्षीदार झालो होतो.
गाडी स्टेशन मध्ये २० मिनिटे उशिरा आली होती. पण माझ्या उत्सुकते पुढे ती २० मिनिटे काहीच नव्हती.
तिकिटे २ टिअर ए. सी. ची होती.
.... पण गाडीत आल्यानंतर मात्र माझा उत्साह तेवढा राहिला नाही. २ टिअर ए. सी. चा डब्बा नुसता डब्बाच होता. गाडी मध्ये विशेष काहीच नव्हतं.
साफ सफाई तर सोडूनच द्या. २ टिअर ए. सी. आणि स्लीपर मध्ये फरक फक्त ए. सी चाच होता.
वाह काय सुंदर जेवण होतं, दृष्ट लागण्यासारखं ! असा राग आला होता वाटत होतं तेच जेवण त्या कुक म्हणवणाऱ्याच्या थोबाडीत मारावं. ना त्या गाडीबद्दल कुणाला प्रेम ना काही आदर ... निदान सहानुभुती तरी ... काही नाही.
गाडी मध्ये कुठेच त्या गाडीबद्दल, तिच्या इतिहासाबद्दल कुठेच काही पाहायला मिळाले नाही. शेवटी नाईलाजाने तक्रार पुस्तिकेत या सर्वाबद्दल तक्रार केली. किती फरक पडतो देव जाणे पण मी तक्रार केली.
पण हे मात्र रोज रडे त्याला ... म्हटल्यासारखंच आहे.
हिच परिस्थिती स्टेशन्स बद्दल ...
नवी दिल्ली असो की हज्रत निजमुद्दिन स्टेशन, देशाच्या राजधानीचे स्टेशन म्हणताना सुद्धा लाज वाटत होती.
मित्रांनो शक्य तिथे मी तक्रार केली. शक्य तिथे मी लोकांना चुकीचं काही करताना थांबवलं. एवढं मात्र नक्की आपणच या परिस्थितीला सुधारू शकू ...!
सांगायचं एवढंच आहे की तुम्ही सुद्धा शक्य तिथे तक्रार करत राहा, विचार करू नका की त्याने काय होणार आहे. शक्य तिथे लोकांना चुकीचं काही करताना थांबवा.
(मी स्वतः चं कौतुक वगैरे करत नाही, फक्त तुम्हाला सांगत आहे, मी कुठेच चुकीच्या जागी कचरा टाकत नाही, थुंकत नाही. धूम्रपान करत नाही. वाहतुकीचे नियम पाळतो आणि अशा चुकीच्या गोष्टी दुसऱ्यांना करूही देत नाही. बस एक विनंती करतो. )
तुम्हाला सुद्धा नम्र विनंती, शक्य तेव्हा तुम्ही सुद्धा नियमांचं पालन करा.
"कोई देश बेहतर नही होता, उसे बेहतर बनाना पडता है !"
धन्यवाद ...!
(मित्रांनो, मी विषय बदलण्याचा प्रयत्न केला नाहीये, अपेक्षा करतो भावना पोचल्या असतीलच)