रात्र काळोखी वेडी, माझ्या उमटल्या सावल्या;
माझ्या मनातले तरंग, ज्यांच्या कल्पना जाहल्या.
आश्रित वादळे जाहली, सुन्या काळजात माझिया;
कसे मागतो मी जगणे, जरी श्वास रिक्त न उरला.
घडणीत रोज जगण्याच्या, या भावना मुक्त झाल्या;
स्वैर वागल्या कशा अशा, कळा जीवा देत गेल्या.
स्वप्ने तुटली ही विणता, त्या निरगाठी मी जपल्या;
वेदना सलतात जेव्हा, त्यांच्या पाकळ्या मोकळ्या.
घाई जगण्याची भवती, माझ्या वाटा शहारल्या;
दुःख माझे केतकीचे, तयाचा सुगंध वेगळा.
बांधले घरटे तयाच्या, कनात अपंग का ठरल्या;
माझी वेस मी ठरवली, सावल्या मी ओलांडल्या.