खेळताना मुलांशी...!

खेळताना मुलांशी,

हरपून भान जाते!

माझा नुरे कदा मी,

जादू घडून येते!

लटके कधी रुसावे,

गाण्यात वा रमावे,

नाना अशा उपाये,

बाल्यास आठवावे!

शल्ये जुनी मनीची,

खेळासवे पळावी,

चाखाल मौज थोडी,

लाभे अपार गोडी!

निष्पाप संगतीने,

ताजेपणा मिळावा,

संघर्ष जीवनाचा

अवघा सुसह्य व्हावा!