चलनी नोटा- निर्मिती व वितरण

मला असा प्रश्न आहे, की चलनी नोटा छापणारा जो कारखाना आहे (नाशिक येथे) त्यांना रोज किती नोटा छापाव्यात असे रिझर्व बँक कोणत्या निकषांनुसार सांगते? काहीतरी आधार तर निश्चितच हवा अन्यथा चलन फुगवटा आणि अन्य प्रश्न येतात.

नोटा हँड ओव्हर करतांना कोणते निर्बंध पाळले जातात? त्या विविध बँकांना दिल्या जात असतील.... पुढे प्रसारार्थ...त्या कशा वितरीत केल्या जातात?

एकूणच नोटा छापणे, त्यांचा काउंट ठरविणे, त्या रिझर्व्ह बँकेला देणे, नंतर त्या प्रसारात आणणे या सर्व प्रोसेस बद्दल उत्सुकता आहे. कुणाला माहिती असल्यास स्वागत आहे.