एक आयुष्य

 एक आयुष्य ...खोलगट दरी


उतार घसरणं भीतीच भिती...

 एक आयुष्य ...बिनधास्त वारा


आज आहे उद्या नाही बेफिकिरीत जाणार..



एक आयुष्य ...मोत्याचा दाणा


जपून जपून ठेवणीत राहणार..  



एक आयुष्य ..आठान्याचा नाना..


काल किंमतीचा आज कोण विचारणार..



 एक आयुष्य ...गरम वाफ


क्षणात दिसणार क्षणात मिटणार..  



एक आयुष्य.. जळती मेणबत्ती..
 स्वतः जळणार फक्त दुसऱ्यांसाठी..  



एक आयुष्य ..रूपं अनेक..
वाटेत भेटतील अनुभव सुरेख...



 जगण्याची भली मोठी कसरत सारी
कधीतरी आठ्वतो आयुष्याचा वजा बाकी...