मी पाहिलेला समाज ..

नमस्कार,
शाखेच्या माध्यमातून बऱ्याच वेळा लोकांच्या घरी जाण्याची संधी मिळते. आपल्याच भोवतालाच्या समाजातील लोक हे कसे राहतात हे बघून कधी कधी वाईट वाटते. मला दिसलेला त्यांचं राहणीमान, आणि मला आलेले अनुभव खाली शब्दामध्ये  देण्याचा प्रयत्न करत आहे...
१ ) बऱ्याच दिवसात छोटा ऋग्वेद भेटला नाही म्हणून त्याच्या घरी गेलो होतो ... ऋग्वेद  घर फार मोठं नाहीये.. जेम तेम २ छोट्या खोल्यांचा फ्लॅट .. ऋग्वेद आत टेबल वर अभ्यास करत बसला होता , त्याच्या आईने दार उघडले, अर्धवट दारात उभं राहून त्या माझ्याशी बोलत होत्या .. एरवी आत या बसा वगैरे म्हणणाऱ्या आज अशा दारातून का बोलत आहेत ते मला कळले नाही ... मी हळूच आत वाकून बघायचा प्रयत्न केला .. आत मध्ये ऋग्वेद चे बाबा त्यांच्या मित्रांबरोबर मद्यपान करत बसले होत ... त्यांचं अतिशय अर्वाच्यं बोलणे बाहेर पण ऐकू येत होत
ह्या गडबडीमध्ये ३री मध्ये शिकणारा ऋग्वेद मात्र आपल्या अभ्यासावर लक्ष देण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता .. ..

२) भूषण हा १२ वीची परीक्षा दिल्यापासून गायबच झाला होता. गल्लीमधल्या काही टवाळ मुलांबरोबर मी त्याला बऱ्याच वेळेस पाहिला होता .. भूषण वाईट मार्गांना लागण्याची शक्यता फार वाढली होती. त्यामुळे आम्ही बऱ्याच जणांनी त्याला त्या मुलांपासून वेगळे करण्याचा बराच प्रयत्न केला .. तेव्हा तो आमच्या हो ला हो म्हणायचा .. काही दिवसांपूर्वीच तो मला दिसला .. एका पानाच्या टपरीवर .. सिगारेट ओढत बसला होता ... आवाजात एक प्रकारची गुर्मी जाणवत होती ...
ह्याला आता बोलून काहीच उपयोग नाही हे मी ओळखले आणि माझ्या वाटेला लागलो ..    

३) अथर्व वाघ २ री मध्ये आहे .. शाखेत खोड्या करण्यामध्ये ह्याचा पहिला क्रमांक .. इतर मुलांपेक्षा जरा अधिकच चपळ, अधिकच चलाख ... त्याची आई त्याला शाखेत सोडून रोज कुठेतरी जायची आणि त्यांना येण्यास मात्र रोज उशीर व्हायचा (तशी कल्पना त्यांनी मला दिली होती)..... बऱ्याच वेळेस एखाद्या मोठ्या मुलाला किंवा मी स्वतः जाऊन अथर्व ला घरी सोडून यायचो .. पण हे रोजच चालू झाले .. त्यामुळे अथर्व च्या आईशी ह्या बाबत बोलावे लागले .. त्याची आई सांगत होती ..
"त्याचे बाबा अचानक घर सोडून निघून गेले आहेत ... त्यामुळे संध्याकाळी मला पोलिस स्टेशन ला जावे लागते.." "उद्यापासून मी स्वतः अथर्व ला घरी सोडत जाईन, तुम्ही ह्याची काळजी करू नका " त्यांचं बोलणे तोडत मी बोललो...

४) मंडई मध्ये सुगंधी पावडर विकणारे आजोबा(वय साधारण ७५- ८० असेल )  मी नेहमी बघतो ... एका हातात १ पिशवी आणि दुसऱ्या हातात त्या संदर्भातलं काहीतरी लिहिलेला एक पुठ्ठा...  ज्या तन्मयतेने ते विक्री करतात ते बघून त्यांचं घर हे त्या धंद्यावर अवलंबून आहे हे लगेच कळेल ..
जेव्हा जेव्हा आपण आपल्या आई वडिलांनी दिलेल्या पैशांमधून बाहेर मज्जा करत असतो तेव्हा तेव्हा त्या आजोबांची आठवण आल्याशिवाय राहत नाही.
कृपया माझ्या लेखणीकौशल्य्यवर जाऊ नका .. मला समाजात वावरताना जे अनुभव आले ते मी इथे मांडायचा प्रयत्न केलेला आहे ..