म्हणतेस् जगणे तुझे...

म्हणतेस् जगणे तुझे
कसे सरळ साधेसुधे-
नयनांत तंव तरळे नशा
ती मजला अगम्य असे ॥

म्हणतेस् पाहिला तूं ऐरावत
पोरका स्वर्गात फिरताना-
माझे सदा मस्तीत विहरणे
भ्रष्ट इंद्रासम तुज रम्य दिसे ॥

म्हणतेस् भव्य सदनिकेत तूं
गच्च सुख कोंडलेले-
मुक्त स्वच्छंद माझे वागणे
ते तुज केवळ ग्राम्य दिसे ॥

म्हणतेस् तंव दर्पणी मनाच्या
प्रतिमा वेगवेगळ्या दाटल्या-
फुलपांखरी आस्वाद घेणारा मी
मज उच्छृंखलता क्षम्य असे ॥

हवे तेव्हा जे हवे ते
ते तुला सारे मिळते-
जे मिळते ते उधळतो मी
दोघांत मज एक साम्य दिसे ॥