नैसर्गिक आपत्तींचे वाढते प्रमाण..

अलीकडे झालेल्या विविध देशांतल्या भूकंपाच्या मालिकेमुळे ( भारतात कोयना, तसेच हैती, चिली, फिलिपिन्स, किरगिजस्तान, तैवान ) तसेच वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तींमुळे (अमेरिकेतील आणि युरोपातील वादळ, युगांडातील भूस्खलन, जापानमधील सुनामी) २०१२ मध्ये निसर्गाचा प्रकोप होवून खरोखरीच पृथ्वी नष्ट होईल की काय अशी भीती वाटते आहे.

मानवाच्या चुकीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे आणि त्याचे परिणाम अशा आपत्तींच्या स्वरूपात भोगावे लागणार असे दिसते आहे.
निसर्ग जतन करायचे ठरवले तरी आता वेळ निघून गेलेली आहे.
आपल्याला काय वाटते?

संदर्भ-

२००९- अमेरिकेत अभूतपूर्व वादळ
२००९- कोयेनेजवळ तीन वेळा भूकंप
जानेवारी २०१०- हैती भूकंप - २००० पेक्षा जास्त ठार
फेब्रुवारी २०१०- चिली भूकंप- ७०० च्या वर ठार
मार्च २०१०- फिलिपाईन्स, किरगिजस्थान भूकंप- २०० च्या वर ठार
- जापान- त्सुनामी
- युरोपात वादळ- १०० ठार
- युगांडा- भूस्खलन - ३०० ठार