काही वेळा.....

काही वेळा कोणीही नसणे
काही वेळा कोणीही असणे

शाळेची मधली सुट्टी..... जीवन
डबा खायला कोठेही बसणे

संसाराचे हैंडल एक धरे
अन दुसऱ्याने पैंडल हापसणे

बोलण्यासही वेळ नसे... त्यांच्या
आनंदासाठी कंबर कसणे

एक जुनाबाजार मनांचा हा
भाव कमी... वापरलेली असणे

मुद्देसुद चर्चा म्हणजे केवळ
एकाने दुसऱ्यावरती ठसणे

वैवाहिक आयुष्य असावे हे
रोजरोजचे दोघांनी फसणे