जेव्हा मी नसेन...

जेव्हा मी नसेन, ही संध्याकाळ अशीच असणार
तो गर्द नारंगी क्षितिजावर तसाच सजणार..
पक्ष्यांचा थवा, घराची वाट धरणार..
सगळे परततील मात्र मी त्यात नसणार..
काही ओल्या पापण्या थोड्या जड वाटणार..
मनाच्या नात्यांना आज कोरड भासणार..
जिवंतपणी कोणाला अस्तित्व मारणार..
आता फक्त नुसत्या आठवणी टोचणार
नको हा त्रास इतका.. आज ना उद्या ते घडणार..
मानवी अपेक्षांचे ओझे.. मी इथेच झटकणार..
वेळ आली जावयास माझी, आता नाही कोणी थांबवणार
फुलांचे हार तुमच्यापाशी.. त्यातला सुगंध अलगद उडणार!