लावण्य सहवासच शोधत होते
संस्कारी शरीर जुमानत नव्हते
अन तुझे अचानक येणे
कसे वागावे माहितच नव्हते
ओल्या डोळ्यांना ते समजत नव्हते
अन तुझे उगिच भिजणे
नजरेला ते सापडतच नव्हते
हृदय धडधडतच होते
अन तुझे जीवघेणे वाकणे
घोगरा घसा, अन शब्द वाजत नव्हते
वेडे मन मोकळे होतच नव्हते
अन तुझे निघून जाणे
मन गोड गटांगळ्या खातच होते
तुझे माझे असेच होणार होते
अन मग आशेने बघणे
माझे हृदय रिकामेच होते
काळीज हरवललेच होते
अन माझ्या मनात तुझे येणे जाणे