रात्र आहे खूप अजुनी वेळ कसा हा जाईना
ओढ आहे माझ्या मनी तुला भेटता येईना
पौर्णिमेच्या भरतीला पाणी खाली होईना
मनीच्या या वादळाला शांत झोपता येईना
दिवस असे संपून जातील भेटी होतील कशा
मनात आहे जगण्याची भली मोठी आशा
आठवणी या मनात दडल्या असतील अशा
हुडकून काढीन चांदण्यात ध्रुव तारा जशा
ठेवीन त्यांना जसा कोंदणामध्ये हिरा भरून
आठवणीच्या बंधनात डोकावत राहीन फिरून
भाव माझ्या मनीचे शब्दात उतरुनी येतील
त्याच शब्दांची फुले उद्या फुललेली दिसतील
जगात तू कुठे असशील शब्दांना त्या स्मरशील
स्मरताच त्या शब्दांना गंध दरवळत उठतील
स्मरूनी त्याच गंधाला क्षण उद्याचे स्फूरतील
मी असेल नसेल पण शब्द कवितारुपी उरतील
कवी - राहुल भोसले
शुक्रवार/ १२. ०३. २०१०
मो. ०९८९३९९०५१७
RGB THE COLOURFUL********* LIFE.