होत्या कैक त्याने व्यथा साहलेल्या

[प्रेरणा: कामिनी केंभावी यांची 'जशा कैक होत्या व्यथा गोंदलेल्या' ही कविता]
 
गंतव्य न काही असा तो प्रवासी
व्यर्थ शीण होतो यात्रेचा तनूसी

भ्रमिष्टापरी भान द्यावे लुटोनी
अताशा असे वाटते यात्रीकासी

कळेना कुणाला असे काय झाले
सावरावे कसे या  भग्न पामरासी

उपाधीच सारी असे भान आले
तसा मृत्यू गाठे तयाच्या मनासी   

होत्या कैक त्याने व्यथा साहलेल्या
'उन्मनी'च वाटे त्याची जनांसी उदासी