******************
******************
तसा ना सुखाचा त्रास काही
उसवती नवनवे भास काही
कशाला मनाचा कोंडमारा
कशाला हवे पथ्यास काही
सुखाचा असे हा मंत्र साधा
करा साजरे वनवास काही
कसा इभ्रतीचा तोल गेला
मिळाले असे फर्मास काही
जगण्या अपात्रच जे तयांच्या
तिजोरीत भरपुर खास काही
जुळावी मनें.. ओठी जुळावे
मिटावे मुके संन्यास काही
मला वाटले जिंकून झाले
नजर मागते विश्वास काही
लळा लावुनी गेल्या क्षणांनो
चला आठवू प्रवास काही
इशारे नभाचे ओळखीचे
तिथे फाटके दुर्वास काही
हसावे जगाने बस हसावे
नको दान मैत्रेयास काही
*******************
*******************