स्वताच्या मुळाशी करांनी स्वतःच्या
कसे घाव मी घालितो हा असा?
जगा माफ केले मला दंड केला
असा नेमका काय घडला गुन्हा?
तुझ्या सोबतीला दिला देह माझा
अता सावलीही न माझ्यासवे
कसा शेवटी हाय जाऊनी तोल
मनाची पुरी बांधणी ढासळे...
जसे शिल्प टाकून अर्धेच
गेले युगांच्या प्रवासा कलाकार ते
तसे जाऊ वाटे इथे टाकुनी हा
उभा जन्म, काव्ये अशी या इथे...
कसा आठवे हा हिशेबीपणा
अन् कशी पाऊले ना खरी झिंगली?
तरी पोचलो मी कसा तारकांत?
अशी कृष्ण जादू कशी जाहली?