चेंडू वेगळे कसे करावे?

प्रिय मनोगतींनो, बरेच दिवस झाले ना कोडं किंवा कूटप्रश्न सोडवून?  हे
घ्या एक ताजं कोडं.

आपल्याकडे तीन वेगवेगळ्या रंगाचे एकूण सहा चेंडू
आहेत. म्हणजे, दोन लाल
रंगाचे, दोन हिरव्या
रंगाचे आणि दोन निळ्या
रंगाचे. त्यात, एक लाल, एक हिरवा आणि एक निळा १५ ग्रॅम
वजनाचे तर उरलेले १६ ग्रॅम वजनाचे आहेत. नुसत्या डोळ्यांनी पाहून त्यांची
वजने समजत नाहियेत. पण, हे सहाही चेंडू दिसायला एकदम सारखे आहेत. समस्या ही
आहे की आपल्याजवळ वजने नाहीत पण एक ताजवा/तराजू आहे ज्याच्या मदतीने दोन
वजनात
आपल्याला हे सहाही चेंडू वेगळे करावयाचे आहेत, म्हणजे
कोणता चेंडू किती वजनाचा आहे हे शोधायचे आहे. कसे कराल?

                                                                                     ...................
कृष्णकुमार द. जोशी