तोच तो गोल चेहरा, तोच जाडसर बांधा
बदल म्हणून म्हटलं मिशी कापावी का अवंदा
मित्र, ओळखीच्यांचे नेहमीच असायचे सल्ले
उडव ती मिशी, ठेव लांब केस नि कल्ले
दाढी वाढव म्हणे कोणी, कोणी म्हणे ठेव "गोटी"
केसांची तर आधीच वा न वा होती
मनात म्हटलं मी,
आपल्याला नाही झेपत बुवा बकरीसारखी हनुवटी
पण सारखी मिशी कातरण्याचा आला होता मला कंटाळा
म्हटलं एकदाची टाकू उडवून, काय होईल तो होऊ दे घोटाळा
होऊन होऊन काय होईल असं,
कोणी बघेल वळून फारतर, थोडं होईल हसं
ह्याच विचारात गेले मग मधले काही दिवस
दिसेन का मी वेडा का एकदम चोककस-सरस
आज सकाळी आला अखेर एकदाचा योग
बुधवार आहे म्हटलं करूया ‘मिश्रकर्तनाचा’ प्रयोग
लक्षात आला माझ्या फार वेळ नाही मोडत त्यात
दाढी करता करता उगाच अजून दोन हात
झाली नाहीशी मिशी; चार वर्षांची मेहनत
ब्लेड च काय जातंय इकडे फिर तिकडे सफा-चट
पाण्याचे हपके दाखवत होते काय नवीन रुपड
आरसा खोटा बोलतोय असं उगाच वाटलं थोडं
काही मिनिटे उभा राहिलो मी स्वत:लाच न्ह्यहाळत
प्रयोग पूर्ण झाला होता पण नेमकं काय होतं बदलत
पण होतो तसाच राहिलो मी आधीच्या प्रमाणे
मिशीने सुद्धा व्यक्तिमत्वात फरक पडतो
असं लोकं का म्हणतात कोण जाणे..