बाप ....... (अंतिम भाग)

खरं तर माझ्या मनात पाठलाग करण्याचं नव्हतं. आपल्याच आईवर संशय घेणं बरोबर नव्हतं . पण मी पडलो आता सरकारी नोकर. सरकारी नोकरीत माणुस काहीही शिकला नाही , तरी दोन गोष्टी शिकतो. एक टाळाटाळ आणि दुसरी संशय घेणं. पैकी संशय घेणं माझ्या अंगात भिनलं होतं. मी जाडकन उठलो. साधारण कपडा घातला. पायात चपला सारकवल्या. जवळ जवळ घावतच निघालो. ती दिंडी दरवाजातून बाहेर पडत होती. मी फार भराभर चालत होतो. ती मेन रोडपाशी पोचली होती. तीन साडेतीन म्हणजे काही फार रहदारीची वेळ नव्हती. तरी गर्दीत कधी कधी आई दिसेनाशी होई. ती सरळ चालत कुंभारवाड्याकडे वळली. रघुवीरांचं ऑफिसची बिल्डिंग दिसली. माझी नजर वर गेली. दुसऱ्या मजल्यावरील ती खोली सील केलेली दिसत होती. आता मला भीतीही नव्हती आणि जरूरही.

आईच्या एवढ्या भराभर चालण्याचं आश्चर्य वाटलं. तिला गाठणं मला कठीण जाऊ लागलं. चालता चालता ती गोल देवळाजवळ आली. तेही ओलांडून ती एका मुस्लीम मोहल्ल्यत शिरली. मला क्ळेना, या ठिकाणी कोणतं रामाचं देऊळ आहे ? तरीही मी चालतच होतो. नंतर ती डाव्या बाजूला एक बोळ लागला तिथे थांवली. तिने मागे वळून पाहिले आणि बोळात शिरली. मी दिसणार नाही अशा रितिने थांवलो. मग धावत जाऊन बोळाचं तोंड गाठलं. आई डाव्या बाजूच्या एका चाळीत शिरली. पाहिलं तर सगळिच मुसलमान वस्ती. ही चाळीची मागची बाजू असावी. बोळात नेहेमीप्रमाणे सांडपाण्याचे पाईप वाहत होते. त्यांचा शॉवर चुकवीत लाकडी जिन्याने वर निघालो. जिन्यावरून लहान लहान मुले धावत होती. माझ्याकडे कोणाचेही लक्ष नव्हते. आई नक्की कोणत्या मजल्यावर गेली, कळणं कठीण होतं. पण माझं नशीब जोरावर होतं. मी प्रत्येक दरवाजापुढच्या चपला पाहात होतो. पहिला मजला सोडला. दुसऱ्या मजल्या वरच्या उजव्या हाताला एक खोली होती. तिचं कुलुप थोडसं हालत होतं. म्हणजे आई नुकतीच आत गेली होती तर. जवळच तिच्या चपलाही दिसल्या. दारावर नाव होतं.

"एस. डी . मिर्झा. " मी आतला कानोसा घेण्याचा प्रतत्न केला. पण काही दबक्या आवाजातील बोलणं आणि हालचालींचे आवाज येत होते. असं दुसऱ्या च्या दाराशी किती वेळ उभं राहणार होतो मी ? पण मला दार वाजवण्याचं धाडस झालं नाही. दुसऱ्या खोल्यांकडे पाहिलं. सर्वांचीच दार लोटलेली होती. धड्याळात चार वाजत होते. त्याच खोलीला जिन्या जवळ असलेल्या खिडकीशी मी आलो. लोटल्यावर जी उभी फट राहते त्यातून आतलं दृश्ञ अंधुक दिसत होत.

आत थोडासा उजेड होता. आणि माझी आई माझ्या (इलाज नाही) हरामखोर बापाच्या मिठीत होती. तो तिच्या अंगावरून हात फिरवीत होता.म्हणजे हे आहे तर " भलतच भजन" माझ्या मनात आलं.मला आता उलगडा झाला.हेच ते निरूपण करणारे बुवा तर. माझा बाप अधून मधून बोलत होता. " किती दिवसानी येत्येस ? " आई भेदरल्या सारखी म्हणाली, " मला नाही आता यायला‍ जमणार . मुलं मोठी झालेली आहेत. जयला संशय आला तर काय करणार ? त्याला आता नोकरी लागलेली आहे. "बापानं तिला धरून ठेवली होती. तो म्हणत होता, " आता तर तुला मोकळीक आहे.; तुला गुरुवारच्या भजनाचं निमित्त नको. एरवी पण तू येऊ शकतेस.नाहीतर मला यावं लागेल. तसही घरी कोणी नसतच. "मी आजुबाजूला सारखा पाहात होतो. कोणी आलं तर? तेवढ्यात . आतल्या एका खोलीचं दार दाणकन उघडलं. एक मुसलमान बाई बाहेर येऊन ओरडली, "अरे, तुम्हारी रंग रलिया कभी खतम नही

होगी. इतनाही प्यार था तो मेरे पास क्यूं आया ? आज दस बरसके बाद भी तुम छुप छुपके ये धंदा करते हो ? आई कडे वळून तिरसटली, "

बेशरम कहीकी. मुसलमान क्या तू तो काफिर भी नही हो सकती. जानवर हो तुम दोनो. " आईने पटकन बाहेरचा दरवाजा उघडला. ती बाहेर

येणार तेवढ्यात मी धडपडत कसातरी जिन्यावरून खाली आलो. आता पाच वाजत होते. मधून मधून तिथे राहणारे लोक येऊ लागले. ते माझ्याकडे डोळे विस्फारून पाहात होते. मी त्यांच्याकडे लक्ष दिलें नाही. मी धावतच मेन रोडला आलो. आता आई घरीच येणार हे मला माहीत

होतं. जे पाहिलं ते इतकं धक्कादायक होतं. , की माझं डोकं भणभणू लागलं. एकीकडे मला रागही आला आणि आईनी फसवल्या सारखं वाटलं.

जिला आपण एवढं मानलं तिला आपला अजिबात भरवसा कसा नाही ? घरी गेल्यावर आईला मी जाब विचारायचं ठरवलं . अर्ध्या तासात घरी आलो. सरू म्हणाली , " तु या वेळेला कुठे गेला होतास ? " मी तिला थातुर मातुर उत्तर देऊन गप्प बसवली. आईची वाट पाहू लागलो. अस्वस्थ्तेने मी येरझारा घालीत होतो. मी जाम चार्ज झालो होतो. पण आई सांगितल्या प्रमाणे सात साडे सात लाच आली. मला आश्चर्य वाटलं.

मी तिथून निघाल्यावर ती कुठे गायब झाली .

ती आत आली. तिच्या कपाळावर हळद कुंकू लावलेलं दिसत होतं. तिनी साडी बदले पर्यंत मी वाट

पाहिलि. मग न राहवून म्हणालो, " काय , झालं का बुवांचं निरूपण ? माझ्या बोलण्यातला खंवचटपणा तिला जाणवला नसावा किंवा ती तसं

दाख्वित असावी. ती म्हणाली , " हो .... झालं की . अरे आज भजन असं रंगलं की भानच राहिलं नाही. तिच्या प्रत्येक शब्दाला माझ्या दृष्टीने

वेगळाच अर्थ होता. पण ती आनंदात होती. तसे ती दाखवीत होती की काय कोण जाणे.

मग मी सरळच विचारलं, " किती दिवसांपासून हे निरूपण चालू आहे? की काही वर्ष ? तिला माझ्या

बोलण्यातली खोच कळली असावी. तिचे तोंड आश्चर्याने उघडे पडले. चेहरा पांढरा पडला. ती म्हणाली, " काय बोलतोयस काय तू? कळतय का

तुला ? " मी चिडून म्हणालो , " चांगलच. " ती म्ह्यणाली, " म्हणजे तू आला होतास तर. पाठलाग केलास माझा. आईवर संशय घेतोस? माझ्या नजरेला नजर न देता ती कातर स्वरात म्हणाली, " अरे , ते खरं नाही रे. " मी म्हंटलं. " काय खरं नाही?, तुझं जाणं ? त्या हरामजाद्याशी जे काही केलस ते ? " मी तिचे दोन्ही खांदे धरले रागाने हालवून म्हणालो, " तुला खोटं बोलायला लाज नाही वाटत ? " तिचे डोळे पाझरत होते. ओठ थरथर्त होते. चोरी करताना पकडलं गेल्याचे भाव तिच्या तोंडावर होते. मी तिला सोडली. थोड्या वेळानी भानावर आल्यावर म्हणाली, " तुला सगळं सांगावच लागेल. तुला काय माहीत हे गेल्यानंतर मी पाच्सहा महिने कसे काढले ते ? काही लोकांनी तर काम देतो सांगून नको ते उद्योग करण्याचा प्रयत्न केला. सगळं सांगणं फार कठीण आहे. ( माझ्या मनात आलं लोक आईला गावभवानी म्हणत) मी कशी तरी पळून आले . नंतर जी कामं मिळाली त्या पैशांतून तुमच्या फिया, कपडे रोजचं खाणंपिणं झालं असतं का? हे अधून मधून पैसे देत असत म्हणून तर सगळं चाललं. त्या बदल्यात त्यांना भेटावं लागायचं. तु आता सगळं पाहिलंच आहेस्. मी तरी कोणाकडे मन

मोकळं करणार? मलाही भावना आहेत. हे तूही लक्षात घेत नाहीस . मला आई, वडील , भाऊ , बहीण कोणी नाही. मला तुझी फार भीती वाटते रे. मी ... काय करू? " बोलता बोलता ती खाली बसली. हुंदके देऊन रडू लागली. तरीही मला दया आली नाही. माझ्या डोक्यावर भूत

सवार झालं होतं.

मी दात खात म्हंटलं., " म्हणजे त्या.......... बापाचंच अन्न मी खाल्लं तर. हा सोडून गेला तो त्या मुसलमान बाईबरोबर ? धर्मसुद्धा बदलेल याच्यासारखा हलकट माणूस . जिवंतपणी गाडला पाहिजे साल्याला. ती रात्र अशीच गेली‌. सरू तर घाबरून झोपून गेली. आई आणि मी रात्रभर बिछान्यावर बसून होतो. सकाळ झाली. डोळे जागरणानी जळत होते. मी तसाच ऑफिससाठी

तयार झालो. आईनी चहा वगैरे तयार केला. पण मी त्याला हात सुद्धा लावला नाही. उलट मी म्हणालॉ, " हे बघ, मी आता अंधेरीत फ्लॅट बुक केलाय., चार सहा महिन्यात ताबाही मिळेल. पण तू इथेच राहायचं. तुला मी नेणार नाही. (इथेच मी चूक केली. नंतर जाणवलं. )मग तो ..... बाप आणि तू घाला गोंधळ. पैसे पाठवीनच मी. असं म्हणून मी ऑफिसला गेलो. दोन चार दिवस घरी न जेवताच मी ऑफिसला गेलो. मग हळू हळू घरी जेवायला मी सुरुवात केली. आता आई घरातून हालेनाशी झाली. मी तिच्याशी पूर्णपणे बोलणं टाकलं. लागलो. ऑफिसच्या परीक्षेत मी पहिला आलो . मला आता इन्स्पेक्टरचं प्रमोशन लवकरच मिळेल.

खाणं पिणं संपलं होतं. माझा पिक्चरचा मूडच गेला.मी त्याचा निरोप घेतला. मणामणाची जड कथा घेऊन घरी आलो. मग महिनाभर असाच

गेला.

एक दिवस सकाळीच त्याचा फोन आला. सहा साडेसहा वाजत होते. तसा मी उठण्यात सूर्यवंशी होतो. मी जरा अनिछेनेच फोन घेतला. तो म्हणाला, "तू लगेच घरी येऊ शकशील का ? " त्यानी मला त्याची आई गेल्याचं सांगितलं. त्यानी त्याचा पत्ता दिला. तरी मला ठाण्याहून त्याच्याकडे जायला साडे आठ नऊ वाजले. चाळीच्या बाहेर मला गर्दी दिसलीच नाही. मी त्याच्या रूमशी पोचलो. दोन खोल्यांची जुनाट जागा. खरी तर एकच रूम . पण लाकडी पार्टीशन घालू न दोन खोल्या तयार केल्या होत्या. आत एक वृद्ध

गृहस्थ होते. ते दिवेकर काका असावेत. त्याच्या आईला अंगावर चादर घालून झाकून ठेवलेली होती. वातावरण भकास होते.मृत्यूची कळा जाणवत होती. जय आईचं डोकं मांडीवर घेऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवीत बसला होता. त्याचे डोळे खोळ आणि काळवंडलेले दिसले. तो रडत होता. मला म्हणाला, " माझी आई गेली रे. गरीब बिचारी परत कधिच येणार नाही. " तो उठू लागला. मी त्याला न उठण्याची खूण केली. त्याच्या आईला मी प्रथमच पाहात होतो. ती आता सगळ्याच्या पलीकडे गेली होती. माझ्या डोळ्यात पाणी आलं . मला माझ्या वडलांच्या जाण्याचा दिवस आठवला. ते तर अपघातात गेले होते. बाहेरून पॅक करून बॉडी घरी आणली होती. मी दिवेकर काकांना पुढील तयारी

बाबत विचारले. चाळीतले कोणीही ढुंकायला ही आले नाहीत.मरणही त्यांचा तिरस्कार संपवू शकले नसावे. समोरचा पानवाला आणि स्टोव्ह

रिपेअर वाला (शेवटी साधारण् अमराठी माणसंच कामाला आली. ) धावत आले. म्हणाले, " काका तुम्ही बसा. आम्ही करतो सगळं. " मग आम्ही तिघांनी मिळून तयारी केली. आम्ही सर्व मिळून पाचजण झालो . आजूबाजूचे लोक एवढे संवेदनाहीन होते. मला मात्र माझ्या मित्राला मदत करायचीच आहे. त्याची बहीण सरस्वती आणि भाऊ भास्कर यांनाही मी प्रथमच पाहिले. मग दिवेकर काकू मात्र आल्या .त्यांनी सवाशीण गेली म्हणून जयच्या आईची ओटी भरली आणि नवीन साडी पण नेसवली. त्याही रडत होत्या. मग आम्ही तिला उचलली. त्या म्हणाल्या, " जय फार वाईट वागले रे मी तिच्याशी. मला क्षमा कर. मी काय मिळवलं राग करून कोणास ठाऊक ?. "

आम्ही यथाविधि चंदनवाडीत जाऊन तिचा अंत्यसंस्कार केला. मग परत जय च्या घरी आलो त्याला थोडं समजावलं. "टेक केअर. काही लागलं तर कळव. " तो म्हणाला, "तुला एवढ्या लांवून येण्याचा त्रास दिला. ". अरे , असं म्हणू

नकोस. आपण खरोखरीचे मित्र आहोत, म्हणून तर तुला मला एवढं सांगावसं वाटल. " मी मनापासून म्हंटले. मी जड अंत; करणाने घरी आलो. आईला थोडक्यात सांगितलं. जवळ जवळ पंधरा दिवसांनी तो कॉलेजला आला. केस कापलेले. डोळे खोल. मला थोडा जास्तच वाकल्या

सारखा वाटला.आता कॉलेज सुटल्यावर तो कधी कधी घरी बोलावीत असे. दोन तीन वेळा मी जाऊन आलो. माझी सरू , भास्कर यांच्याशी चांगलीच मैत्री जमली. माझा गप्पा मारण्याचा स्वभाव असल्याने त्यांना मी आवडू लागलो. फक्त मला काय हाक मारायची त्यांना समजत नसे.एकदा मी त्यांच्या घरी पेपर वाचीत बसलो होतो. तर एक वृद्ध गृहस्थ दरवाजा उघडा असून ही वाजवीत असताना दिसले. ते साठीचे असावेत. दाढी वाढलेली. डोक्यावर टक्कल. तोंड पानानी रंगलेले. अंगात कुर्ता आणि पायजमा. जय आत काहीतरी करीत होता. मी विचारल्यावर ते जयला भेटायचय म्हणाले. मी त्यांना आत यायला सांगणार होतो तेवढ्यात जय आला. आणि त्या माणसाला पाहून त्याच्या अंगावर धावला. मला म्हणाला, " हाच माझा ........ बाप. माझा म्हणायला लाज वाटते. साल्यानी माझ्या आईचा जीव घेतला. "त्याने त्याचे

बकोट धरले. आणि मारण्यासाठी हात उगारला. मी जयला कसातरी बाजूला केलं. तो बडबडत होता. "साल्या तू आलासच कसा ? तिचा जीव घेऊन समाधान झालं नाही का.? त्या वृद्ध माणसाचे डोळे मोठे झाले. जयची बडबड चालूच होती. " साल्या , धर्मसुद्धा बदललास तू .? मिर्झा चल पळ इथून , नाहीतर चपलेनी मारीन. " असं म्हणून तो चप्पल पाहू लागला. त्याला एक बूट मिळाला, तो त्याने फेकला. तो त्या माणसाच्या डोक्याला लागला. तो निराशेने जवळ जवळ धावतच गेला. मग जयनी दार लावून घेतलं. आणि तापुन म्हणाला, " स्साला हा असा. किती प्रॉ ब्लेम येईल माहित आहे?बहिणीशी लग्न करणार कोण? त्यातून आपला समाज हा असा. हलकट. दुसऱ्याच्या कमीपणावर हसणारा." तो चांगलाच डिस्टर्ब झला होता. त्याला मी कसातरी शांत केला आणि गेलो.

नंतर यथावकाश आम्ही बी. कॉम झालो. जय" इन्स्पेक्टर" म्हणून प्रमोट झाला. मला "क्लास टु "चं प्रमोशन मिळालं. त्याने लॉ जॉइन केला. मग काही महिने आमच्या भेटी होणं कमी झालं . फोन वरून मात्र आम्ही नियमीत

बोलत असु. आता तो अंधेरीच्या फ्लॅट मध्ये राहायला गेला. एक दोन वेळा माझ्या घरी येऊन गेला. असाच एका रविवारी मी त्याच्या घरी गेलो

होतो. फ्लॅट पाहण्यासाठी बोलावलं होतं. मग जेवणही तिथेच झालं. अशाच इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. मी सहज भिंतीवर पाहिलं , तर दिवेकर काकांचा फोटो. मी विचारल्यावर तो म्हणाला, " अरे ते चाळ सोडल्या नंतर गेले. मी गेलो होतो. चाळीतले काही जण होते. पण मी त्यांना ओळखही दाखवली नाही. ते माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करीत होते. आता माझी पाळी होती . त्यांना झटकण्याची. तुला सांगतो , काका गेल्यावर मला चार दिवस झोप लागली नाही. त्यांचे आणि माझे संबंध काय होते , कोण जाणे . पण मुलासारखे प्रेम करायचे माझ्यावर. " मी म्हंटल, "हो. पण आता सगळं स्थिरस्थावर झालय ना ? " तो म्हणाला, " रे. "

मी म्हंटलं. "अरे , एखाद्या विवाहसंस्थेत नाव का नोंदवत नाहीस तिचं. म्हणजे आपोआप स्थळं येतील. " तो म्हणाला, " अरे तिथे तर सगळी माहिती द्यावी लागते. बापकाय करतो ? काय लिहू ? मुसलमान आहे लिहू ? एक तर ती

मॅट्रिकही नाही. आता ती बाहेरून परीक्षा द्यायची म्हणते.. " मी म्हंटलं. " मी पण पाहीन स्थळं. तिच्या अपेक्षा काय आहेत ते सांगून ठेव. "

त्यावर तो म्हणाला, " अरे, तिच्या कसल्या आल्या अपेक्षा . तिला ना नोकरी ना काही. काय करावं समजत नाही. " मग मी थोडा विचार केला. किंवहुना , हा विचार माझ्या मनात पूर्वी पासून असावा. तो बोलतच होता. स्थळं काय अशी वाटेवर पडल्येत ? वगैरे. , मध्येच सरूने चहा करून आणला. आम्ही चहा घेत होतो. मी म्हंटलं., " होय स्थळं वाटे वरच पडल्येत. तुला पाहिजे तसं स्थळ तुझ्या समोरच बसलय. त्याच्या हातातला कप डचमळला. तो म्हणाला, " वाटेल ते काय बोलतोयस.? .... थोडा वेळ शांततेत गेला. मग तो म्हणाला, " जरा विचार कर. तुझी आई वगैरे काय म्हणतील ? मुलीचे वडील काय करतात असं विचारलं तर तू काय सांगणार आहेस ? तूच विचार कर. हे सगळं सिरीयल मध्ये वगैरे ठीक आहे रे. तुला शिकलेली आणि चांगली मुलगी सहज मिळू शकते. तुझ्या आईच्याही काही अपेक्षा असतीलच. आम्हाला एक नातेवाईक नाहीत. पण तुला भरपूर नातेवाईक आहेत. त्यांचं काय? "

मी म्हंटलं. " नाही जय, मी माझ्या विचारावर ठाम आहे. शिक्षणाचं म्हणशील तर ती मॅट्रिक झाली की लग्न करु. पण तिनी पुढे ग्रॅजुएशन करावं अशी माझी अट आहे. फक्त तिला मान्य आहे का ते विचार. " तिला काय विचारायचं ती नाही म्हणणार नाही. तू हे खरच बोलतोयस ? " तो गदगदला, आणि म्हणाला, "तू दोस्ती खातर तर हे करीत नाहीस ना? तिचं जर काही चुकलं तर सांभाळून घेशील ना? (त्याच्या डोळयात पाणी होतं) आम्हाला कसलेच अनुभव नाहीत रे. त्याने मला भावनातिरेकाने मिठी मारली. आईला मी पटवून दिलं , सगळ्या गोष्टींची जाणीव असलेली मुलगी आहे. मग वर्षभर थांबायचं ठ्ररवलं. ती मॅट्रिक झाली. तिच्या आणि माझ्या भेटी गाठी होतच होत्या. माझ्या अपेक्षेपेक्षा ती जास्तच चांगली निघाली. लवकरच मुहूर्त पाहून लग्न झालं. या सगळ्याला आता सात आठ वर्ष झाली. सरू पण नोकरी करते.

मध्यंतरीच्या काळात जयचं एका दाक्षिणात्य मुलीशी प्रेम विवाह झाला. ती सी . ए. होति.

तिचा प्रोफेशन असल्याने जयच्या आणि तिच्या भेटी होत असत. मागचं सगळं आयुष्य आता एक स्वप्न म्हणून पाहातो. दिवेकर काकां बद्दल

मात्र तो फार पझेसिव्ह आहे. तो म्हणतो, " ते नुसते वडील नव्हते रे. (बाप नाही) देवदूत होते. मला सगळ्यातून बाहेर काढणारे. त्याचा तो ".....बाप" (त्याच्याच शब्दात)पुन्हा कधी त्याच्या आयुष्यात डोकावला नाही. एक खंत मात्र त्यालावाटते कि आईला त्याने दिलेली वागणूक चुकीचीच होति. नाहीतर आज ती हे सगळं बघू शकली असती.

पण त्याला अजूनही रुबाबदार आणि स्मार्ट माणूस म्हंटलं की आठवतात

"ए. टी र घु वी र .

(संपूर्ण)