तू माझ्यात ...

तुझे मुक्त अस्तित्व गात्रांत माझ्या

तुझा गंध, बेधुंद श्वासांत माझ्या ..
   तुला ठेविले मी जरी काळजात
   सखे तु उतरलीस प्राणांत माझ्या ..
जरी पेंगला चंद्र गगनात राणी
तुझे स्वप्न जागेच डोळ्यांत माझ्या ..
   तृषा भागली ना अजूनी मनाची
   तुझे ओठ गुंफून ओठांत माझ्या ..
मला जायचे चांदण्यांच्या महाली 
तुला घेउनी बाहुपाशांत माझ्या ..
   कळेना तुला मूक भाषा मनाची?
   गडे शोध तू अर्थ गाण्यांत माझ्या ..