टाळलेला आजही निष्णात कोणी
धुमसतो अद्याप माझ्या आत कोणी
माहिती होती जगाला गोष्ट सारी
बोलले नाही तरी जोरात कोणी
केवढा आहे महत्त्वाचा पहा मी
सांडलेले रक्तही भरतात कोणी
का मला टाळून गेली ही दुकाने?
[ वेदना भरतात का... गल्ल्यात कोणी? ]
आपली ओळख असावी फार मोठी
एवढ्यानेही कवी होतात कोणी
मद्यपींना एक माझे सांगणे की,
भाकरीसाठी पहा फिरतात कोणी
दैव होते चांगले की जन्मलो मी
अन्यथा मरते कधी गर्भात कोणी