पुण्यातल्या आणखी काही खाऊच्या जागा

२००७ साली झालेली चर्चा अत्ता वाचनात आली ... आता पुण्यात खूप नवे फूड जॉईंटस झाले आहेत... मला आवडणाय्रा काही जागा खालीलप्रमाणे

  1. चायनीज रूमः कॅंप एरिआ, विल्स लाईफस्टाईल जवळ
  2. द प्लेसः सिझलर स्पेशल हॉटेल... ज्या माणसाने सिझलर ह्या पदार्थाचा शोध लावून मुंबईमध्ये टूशे नावाचे हॉटेल काढले त्याचे हे हॉटेल आहे. वेस्ट एंड थिएटर च्या बाजूला.
  3. मलाक्का स्पाईस. : थाई, जॅपनीज, चायनीज, अश्या विविध पाककृती येथे मिळतात
  4. कर्वः ए. बि‌. सी फार्म्स मधील एक हॉटेल.. ईटालियन फूड स्पेशल
  5. ए. बि. सी फार्म्स: येथे हैद्राबादी, चायनीज, ईटालियन अश्या विविध प्रकारचे पदार्थ मिळणारी सेपरेट ५-६ हॉटेल्स आहेत... कोरेगाव पार्क एरिया मध्ये आहे.
  6. मेनलँड चायनाः ऑथेंटिक चायनीज मिळते... बंड गार्डन रोड
  7. सिगरीः मेनलॅड चायना शेजारी.. सर्व प्रकारचे पदार्थ मिळतात परंतु इथल बुफे प्रसिद्ध आहे... ११ ते दुपरी ३ वेळात मिळतो
  8. कलिंगाः सुंदर जेवण... भारतिय पद्धतीचं .. पंजाबी वगैरे... चीज बटर मसाला नावाची गोड चवीची भाजी मिळते येथे.... सुंदर असते
  9. देव अंकल्स किचनः गंगाधाम सोसायटी, बिबवेवाडी कोंढवा रोड वर... फक्त व्हेज... पंजाबी जेवण... स्वतः देव अंकल आपल्याला पदार्थ सुचवायला येतात... अप्रतीम पंजाबी फूड
  10. १०० बिर्याणीज : भारती विद्यापिठ समोर.... कोणतीही बिर्याणी छान असते
  11. कोयलाः नॉनव्हेज छान असते...
  12. द जॉर्जः कॅंप, विल्स लाईफस्टाईल जवळः नॉनव्हेज स्पेशल
  13. ओऍसिस क्लब, अप & अबॉव्ह, गार्डन कोर्ट वगैरे चांदणी चौकातील हॉटेल्स सर्व समान दर्जाची आहेत... चांगली आहेत... ऍंबीयन्स साठी प्रसिद्ध आहेत.
  14. सुकांता झेड ब्रिज खाली, श्रेयस आपटे रोड वर, दुर्वांकुर वगैरे थाळी रेस्टॉरंटस आहेत... मला सुकांता विशेष आवडते
  15. डेक्कन अस स्टॉप बाहेर,, बाटा शोरुम लगत मोने काकांची अंडाभूर्जी ची गाडी असते... तिथे सर्व अंड्याचे प्रकार छान मिळतात
  16. राजधानीः गोल्ड ऍडलॅब्स, कोरेगाव पार्क; गॉर्डन हाऊसः ए स्क्वेअर, युनिव्हर्सिटी रोड; ही हॉटेल्स पण सुंदर आहेत

मी शाकाहारी आहे... पण माझ्या नवय्राच्या-स्वप्नील च्या सांगण्यानुसार वरील सर्व हॉटेल मधील नॉनव्हेज सुंदर आहे....

ह्याशिवाय २००७ साली चर्चेतून पुढे आलेल्या हॉटेल्स ची नावे पुढीलप्रमाणे

बिपीन स्नॅक्स, गरवारे कॉलेज समोर, कर्वे रोड.
शिरा, पोहे, उपमा, खिचडी/खिचडी-काकडी, वडा पाव, पाव-पॅटिस, चहा.
दुर्गा कॅफे, पौड रोड
कोल्ड कॉफी (रु. ८/-), अंडा भुर्जी, हाफ फ्राय
ज्युस वर्ल्ड, ईस्ट स्ट्रीट
नावावरुनच लक्षात येईल. सिताफळ पल्प खुपच छान.
कोकण एक्स्प्रेस, डहाणुकर कॉलनी
नॉन-व्हेज साठी प्रसिद्ध. मासे चांगले मिळतात.
आईसक्रीम-मॅजिक, करिष्मा सोसायटी, कोथरूड
खास करून: कॅडबरी मिल्कशेक
मानकर डोसा, एरंडवणे पोलिस स्टेशन जवळ
सर्व प्रकारचे डोसे आणि उत्तपे.
चिवडेवाला, अप्पा बळवंत चौक (पुस्तकांची दुकान संपल्यानंतर लगेच)
मनोहर स्नॅक्स, मेहेंदळे गॅरेज. कोथरूड.
घरगुती जेवण छान मिळतं.
अनारसे बंधू सामोसेवाले, मोबाइल शॉपी समोर, सदाशिव पेठ
जिवाला खा सामोसे
रामनाथ उपहार ग्रह, टिळक रोड
कोल्हापूरी मिसळ, कांदा भजी
सुजाता कोलड्रिंक हाऊस, शनीपारच्या जवळ
ईथे मस्तानी, आईस्र्किम उत्तम मिळते.
जोशी वडेवाले:: वडा-पाव, भजी यासाठी प्रसिद्ध
कयानी बेकरी:: यांचे केक्स, स्ट्रॉबेरी शॉर्ट-ब्रेड पूर्ण पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध
जर्मन बेकरी, कोरेगाव पार्क
इथे चांगले पदार्थ मिळतात. चहाचे तर विविध प्रकार उपलब्ध आहेत.
चैतन्य, ढोले पाटिल रोड
पंजाबी डिशेससाठी प्रसिद्ध.
वडापावची गाडी, पौड रोड (आनंद नगरकडून वनाज कडे जाताना राहूल कॉंप्लेक्सच्या समोर [उजव्या हाताला] एका मेडिकल दुकानापाशी. )
इथला वडापाव आणि मूग भजी केवळ अप्रतिम. वेळ: फक्त संध्याकाळी.
मान्साहारी ऊपहारग्रुहे
१. तिरंगा बिर्याणी (सातारा रोड, पौड फाटा, पासोड्या विठोबा जवळ)
२. गोपी (पेरू गेट पोलिस चौकीजवळ, सदाशिव पेठ)
३. आवारे मटण हाउस (पत्ता नक्की ठाऊक नाही, कोणी सांगू शकेल का? )
४. दुर्गा बिर्याणी (सदाशिव पेठ)
५. एस. पी. बिर्याणी (एस. पी. कॉलेज समोर)
६. जगुबाई (पिंपरी)
७. सह्याद्री (जगताप डेरी फाट्यापासून पुढे गेल्यावर लागते)
८. रानजाई (वाकड फ्लायओवर जवळ)
९. निसर्ग (नळस्टॉप जवळ)
१०. बांबू हाऊस (शिवाजी नगर)

वैशालीतली शेव बटाटा दही पुरी, (उत्तप्पा सुद्धा-चीझ बटर टोमॅटो ओनियन उत्तप्पा)

'पुण्यात अशा अनेक खानावळी आहेत. डोळ्यांसमोर लगेच आलेली काहीच नावे--
१. बादशाही (टिळक रस्ता)
२. पुणे बोर्डिंग हाउस (पेरूगेट पोलिस चौकीसमोर)
३. जनसेवा (डेक्कन)
४. श्रेयस (आपटे रस्ता)
५. अभिरुची - भिडे बाग (सिंहगड रस्ता)

ऱाजवाडा :- बटर चिकन
हिंदुस्तान:- पॅटीस
कचरा डेपो समोर:- उपवासाची कचोरी (घरगुती)
गणेश भेळ : भेळ, पाणीपुरी, रगडा-पॅटीस अप्रतिम,
कोंडवा रोड - कल्याण भेळ - भेळ, पाणीपुरी, रगडा पऑटीस
वाडेश्वर - बाजिरव रोड - इडली चटणी
पुरेपुर कोल्हापुर हे हॉटेल पुण्यात पेरू गेट पोलिस चौकीजवळ आहे. तिथे अस्सल कोल्हापुरी चवीच मटन आणि चिकन खायला मिळेल. पांढरा रस्सा तांबडा रस्श्यासोबत.
हॉटेल गारवा (सी फूड साठी) हॉटेल सावली (शाकाहारी फक्त, पंजाबी डिशेस )
मयुर डायनिंग हॉल चिंचवड येथे (गुजराथी थाळी)

तुम्हाला अजून आठवताहेत का? आम्हाला ट्राय करायला आवडेल.