फांदी-२

आमची प्रेरणा : प्रदीप कुलकर्णींची अप्रतिम गझल "फांदी".

........................................
फांदी-२

........................................

अर्थ शब्दांचा जरा आहे अघोरी!
काव्य आहे आमचे  थोडे मुजोरी!

येव्हढा गलका इथे का चाललेला?
तोकड्या कपड्यातल्या जमल्यात पोरी!

बायको समजून  धरलेले जिला मी...
नेमकी सासू निघावी  पाठमोरी!

का अधी केलेस त्याच्या धन हवाली?
अन जगाला सांगतो झालीय चोरी...

पाहता कविता नवी मजला कळवती...
"केशवा" कविता  नवी आलीय कोरी!

पोच 'काट्या'ची कमी पडते जराशी...
उगिच ना देहास या, म्हणतात बोरी!

येव्हढे हे काय जे चमकून गेले?
आरसा ना आमचे टक्कल बिलोरी!

मी तुझ्या कवितेस कंटाळून गेलो...
"केशवा" झाली तुझी कितवी लगोरी?

आमची दुसरी कुठे नाहीच 'फांदी'...
ही पुणेरी धन्यता, ना ही मुजोरी!

- केशवसुमार

........................................
रचनाकाल ः  १४ मे २०१०
........................................