तू कधी ही न रागावली पाहिजे

तू कधी ही न रागावली पाहिजे
तू कधी ही न रागावली पाहिजे
हे मला पावलो पावली पाहिजे
मी जरी साहतो ऊन ग्रीष्मातले
तुजवरी हरघडी सावली पाहिजे
मी कुणा आवडो,वा  कुणा नावडो
मात्र सर्वांस तू भावली पाहिजे
चक्र पायात मी घेवुनी हिंडतो
तू कुठे ना कधी धावली पाहिजे
आज ''कैलास'' आहेस निर्धास्त तू
तुजसवे ती न धास्तावली पाहिजे
डॉ.कैलास