हा ऋतू इमानी नाही

बिलगूनी राहा गं मजला

मी सखे सांगतो तुजला

हा ऋतू इमानी नाही.. १

हे तुझे निमंत्रण मजला

मी अव्यक्ताचा शेला

हा देह इमानी नाही.. २

बहरलो जरी मी इतुका

गंधात तुझ्या विरण्याला

हा चंद्र इमानी नाही.. ३

हा शब्द प्राण गं माझा

देहाचा नखरा तुझीया

हे भान इमानी नाही.. ४

स्पर्शात उखाणा माझ्या

उकलतो जरी गूढाला

हा बंध इमानी नाही.. ५

निस्पर्श स्पर्श जरी माझा

स्पर्शतो रोम रोमाला

नियती इमानी नाही.. ६