जगा !

जगा मी तुला कां पटू लागलेला ?
तुझ्यासारखा की दिसू लागलेला ?

तुला पाहताना झुला व्हायचो मी
जुना झोल आता सरू लागलेला

तुझा डंख माझ्या इमानास झाला
उभ्या   रोमरोमी   भिनू   लागलेला

असे   मिसळूनी   एकमेकात   गेलो
तुझा श्वास माझा असू  लागलेला

कधी   संपलो   सोसताना   कळेना
कुणी आत आता कण्हू लागलेला

उभा जन्म  शिक्षेपरी   वाहिला मी
सुटायास   कां  घाबरू  लागलेला ?