शब्द निसरडे

शब्द निसरडे
===================

आठवते ना
सर वेडी कोसळताना
ओघळले शब्द निसरडे निथळताना..
असा बरसू नको पावसा...!!

आठवते ना
घर गळके आवरताना
पुसले निपटले थेंब शहारे कोरडताना..
अता भिजवू नको पावसा...!!

आठवते ना
तुफान दारी घोंघावताना
पडले झडले चिरे कितीक जपताना..
उगा चकवू नको पावसा...!!

आठवते ना
जग महापुरी वाहवताना
मिटले तुटले बांध किनारे बुडताना..
तसा तडकू नको पावसा...!!

===================
स्वाती फडणीस....... १६-०६-२०१०