सल तेच जुने..

सल तेच जुने फिरुनी रुतले..

कां चांदणवेळी नभ फुटले?
अश्रुंचा कां उपहास असा?
रडता रडता का स्मित फुलले?
नुरलो लढुनी वाऱ्या संगे..
पंखाविण आतां नभ कसले?
चांदण्यास घे तू हाताशी..
हे उन्हात माझे घर वसले..
पापण्यांत झालर ओली ती..
जग पाहून हे हसणे फसले!