(भान)..

प्रेरणाः प्रदीपपंतांचं 'भान'

सासरचे ज्याला 'बा'घर करता आले,
त्यालाच मरेतो सुखात जगता आले ।

देऊन भलेही ताऱ्यांइतक्या साड्या,
पत्नीस कुणा वश कधिही करता आले?

विसरून कधीचा तुलासुधा गेलो मी,
बहिणीस कुठे पण तुझ्या विसरता आले?

आत्ताच फक्त तुज गृहात धरले आहे
पूर्वी न कधी तुज गृहात धरता आले!

मी रोज 'मनी' च्या पाठी जातो; येतो
अद्याप कर्ज पण कुठे फेडता आले ।

त्यानेच जाणली सिस्टिम वरती, खाली-
- देताही ज्याला घेता घेता आले ।

सत्तेच्या मोहा तिने सोडले जेव्हा...
पंजा वर करुनी तिला मिरवता आले ।

'ती' 'स्वयंवरी' समृद्ध होउनी गेली,
अद्याप तिला पण कुणा न वरता आले ।

माझीच वेळ ही चुकली मागायाची,
हे भान 'कहाणी' रचता रचता आले...।

कविते, तव खोड्या अशाच आम्ही काढू,
चैतन्य, केशवा कुणा आवरता आले??