राजमा

  • राजमा १ वाटि
  • कान्दे २ पातळ चिरुन
  • टोमॅटो २ चिरुन
  • जिरेपुड ४ चमचे, तिखट तुमच्या मनाप्रमाणे चविनुसार.
  • गरम मसाला १ अर्धा चहाचा चमचा (ऑप्शनल)
  • हिन्ग. हळद पाव चमचा, जिरे १ चमचा, ओवा चिमुट्भर
  • मिठ चविनुसार.
  • तेल आवश्यक्ते नुसार
  • गरम पाणि १ वाटि
३० मिनिटे

प्रथम राजमा रात्रभर पाण्यात भिजत ठेवावा. दुसरे दिवशी उकड्वून शिजवून घ्यावा. शिजविताना पाण्यात मिठ, ओवा, जिरे टाकावे.

आता कडई मधे तेल गरम करावे. हिंग चिमुटभर टाकून कान्दा घालावा. कांदा लालसर होईसतोपर्यंत परतावा.लालसर  होत आला कि लगेचच  टोमॅटो टाकून परतावा टोमॅटो मऊ होइस पर्यंत . मग हळद, तिखट, जिरेपुड मिठ टाकून हलवा १ मिनिट मग राजमा घालून मस्त परता. १ वाटी गरम पाणी घालून १ वाफ येउ द्या. म्हणजे सगळ मिळून येइल. शेवटी २ चिम्टी गरम मसाला घाला. खाली वर करुन घ्या.झाली भाजि.
भात किवा पोळी बरोबर खा.

राजमा मध्ये कधिही जास्त मसाला चांगला लागत नाहि.असे माझी आई म्हणते..हि पद्ध्त सोपी जरी वाटली तरी फार चविष्ट आहे.

आवश्य करून पाहा आणि आपला अभिप्राय कळवा..:)
माझि माय ...आई