बटाट्याचे भुजणे

  • बटाटे ४ , कान्दे ३, टोमॆटो २
  • लसणीचा आखा कान्दा सोलुन वाटुन पेस्ट करुन
  • १ ते २ हिरव्या मिर्चिचे तुकडे
  • कोथिम्बिर चिरुन थोडिशी
  • हळद, हिन्ग, तिखट मिठ चविनुसार
  • तेल आवश्यक्ते नुसार.
  • गरम पाणी आवश्यकते नुसार
२० मिनिटे
बटाट्याचे भुजणे
बटाट्याच्या जराश्या जाड्सर काच्र्या करुन घ्या.  कान्दा व टोमॅटो उभा पण ओबड धोबड चिरुन घ्या. एका खोलगट भान्ड्यात किव्वा ताटात चिरलेला कान्दा, टोमॅटो, वाट्लेली लसुण, हिरवी मिर्चि तुकडे,कोथिम्बिर, हळद, हिन्ग, तिखट मिठ व तेल घ्या. हे सगळे इन्ग्रेडियन्ट्स छान पैकि कुस्करुन घ्या स्वच्छ धुतलेल्या हाताने. आता त्यात बटाटे मिक्स करुन घ्या. हे मिश्रण कडईत घेऊन बटाटे बुडेल इतपत गरम पाणि टाकुन
गॅस चालु करुन मन्द जाळावर बटाटा मऊ होइसतोपर्यन्त झाकून शिजवा मधुन मधुन थोडेसे वर खालि करा. जरुर भासल्यास थोडे पाणि टाका अजुन.
गरम गरम पोळी वा भाता बरोबर वाढा.
भाजिला फ़ोड्णी द्यायची अजिबात आवश्यकता नाहि. पध्द्त वेगळि आहे. हळद टोमेटो आणी तिखटा मुळे रन्ग सुन्दर येतो. हि रस्सा भाजि भात किवा पोळि बरोबर झकास लागते.
माझि माय ... आई