साहित्यशोध

मित्र मनोगतीहो नमस्कार,

गेले काही दिवस मी मनोगतावरील जुने साहित्य/कथा/कविता/ चर्चा वगैरे वाचते आहे.... अगोदरचे पान - अगोदरचे पान करत मी हळू हळू पान क्र.५४ वर पोहोचले आहे... अत्ताच थोड्या वेळापूर्वी पाहीजे/मिळेल वाली चर्चा वाचून काढली.... त्यात कवी भूषण ह्यांची एक कविताही पूर्ण मिळाली... आणि मग मनात आले की आपण साहित्यशोध करायलाच हवा....

साहित्यशोध ह्या शब्दामागे माझा म्हणण्याचा अर्थ असा आहे, की पूर्वी होऊन गेलेले कवी/गीतकार/लेखक ह्यांचे असे साहित्य जे सहज उपलब्ध होत नाही... किंवा काही साहित्य अप्रकाशित असलेले परंतु तुम्हाला कोणाकडून/कुठून मिळालेले आहे... किंवा तुम्ही अथक प्रयत्न करून मिळवले आहे...

अजून एका गोष्टीचा समावेश ह्यात करता येईल.... अमुक लेखकांनी तमुक कवीची सांगितलेली जुनी आठवण, गंमतशीर घटना वगैरे तुम्ही कुठून ऐकल्या असतील तर त्याही आपण येथे सांगू शकतो... म्हणजे त्या इतरांनाही कळतील...

आता मी सध्या काय शोधते आहे ते सांगते.... खरे पाहता मी अत्ता तरी भाऊसाहेब पाटणकर ह्यांची शायरी शोधते आहे.... १-२ जालावर मिळाल्याही आहेत.... परंतु तेवढ्यात काही आपले पोट भरणे शक्य नाही.... म्हणून तुमच्याकडे भाऊसाहेब पाटणकरांची/ त्यांच्या शायरीची काहीही माहीती असेल तर ती येथे कळवणे.... तुम्हाला माहीत असलेल्या शायरी येथे डकवल्या तरी चालेल अन्यथा त्यांचे संग्रह / किंवा ते कुठे मिळतील हे सांगितले तरी चालेल...

सोबतच मला कवी भूषण ह्यांच्याही ईतर लेखनाचा शोध आहे... ह्याबद्दलही लिहावे....

ह्याव्यतिरिक्त वर म्हंटल्याप्रमाणे, कोणत्याही कवी/गीतकार/लेखक/ साहित्यिकाचे अप्रकाशित, दुर्लभ साहित्य, त्यांच्याबद्दलच्या आठवणी लिहाव्यात....

आधीच्या पाहिजे / मिळावे मध्ये प्रेषक मृ ह्यांनी " ऊन ऊन खिचडी, साजुक तूप; वेगळ व्हायंच हवंय मला सूख " ह्या कवितेची मागणी केलेली... ती मला प्रतिसादात सापडली नाही... ती देखील असल्यास कळवावी...  

प्रतिसादांची वाट पाहात आहे...  

धन्यवाद.

प्रलगो