(माझ्या तुझ्यात काही, काही असे घडावे)

प्रेरणा : जयन्ता५२ यांची गझल "माझ्या तुझ्यात काही, काही असे
घडावे"

माझ्या तुझ्यात काही, काही असे घडावे
सांगू नये
जगाला, चुपचाप निस्तरावे

पंचांग म्हणत कुठले की आजची अमावस ?
'दाते'
न 'कालनिर्णय', बहुधा 'टिळक' असावे

आडून चौकशी का होते जनांकडूनी
इतक्यात
सर्व लफडे त्यांच्या पुढ्यात यावे ?

अफवा कशा पसरल्या गावात जाणतो
मी
बघुनी मुले तुझे ते रेंगाळणे असावे

माझ्याच बायकोची ही काय
राजनीती ?
सोडून कक्ष माझा मजलाच घालवावे

"माझ्याच कुंकवाची ही काय कार्यरीती ?
संघात दक्ष आणिक कक्षात सुस्त व्हावे"

-----------------------------------

खोडसाळ