खुळा साज आहे..

कुणी का पुसावे.. कसा आज आहे?

जसा काल होता.. तसा माज आहे!!
किती टाळले नियतीचे इशारे..
("तुझा" आजही आंत आवाज आहे!!)
नसे आजच्या बोलण्या अर्थ काही..
मौनासही हया "मुका" बाज आहे!!
उमलतांच मी, ती कळी कां मिटावी?
कसा मोगराही दगाबाज आहे!!
सत्यास कवडी, असत्यास रुपया!!
नसावी जगाला... मला लाज आहे!!
"मनीं" गाडले दुःख ते, विरह तो मी..
तुम्हाला जमेना?.. तुम्हा "ताज" आहे!!
कसा आज झंकारला वेदनेने..
मनाचाच माझ्या खुळा साज आहे!
-- बहर.