आयुष्याच्या वाटेवरती

आयुष्याच्या वाटेवरती

आयुष्याच्या वाटेवरती कुणीच कुणाच नसत.
सगळीकडे भटकत जाणार मन आपलस असत.
आयुष्याचा महासागर पोहून पार करत असताना,
आपल मन खुप धडपड करित असत.
मरणाच्या वेळी मात्र एकाकी पडत असत.
खरच आयुष्य म्हणजे दुसर काही नसत,
तर पाण्याबाहेर आलेल्या माशाची जगण्यासाठी चाललेली धडपड असत.
आयुष्याच्या वाटेवरती आपल मन गाडीच्या चाकाप्रमाने कधी वर तर कधी खाली होत असत.
आयुष्याचा डोंगर चढत असताना, दु:खाना, संकटाना सामोर जाव लगत.
आयुष्य म्हनजे स्वतःला न उमजलेल एक कोड असत.
त्याला सोडायचा प्रयत्न केला की ते आनखी गुंतागुंतीच होवून जात.
त्याच्यापासून दुर जाण्याचा प्रयत्न केला की ते आपली पाठ सोडत नसत.
आयुष्य हे कळीतून आलेल्या फुलाप्रमाने असत.
आयुष्य म्हनजे स्वला:ला मिळालेल एक वरदान असत.
दुखा:शिवाय आणि सुखा शिवाय आयुष्य जगन अशक्य असत.
                जितेंद्र गावंडे (९९२२४७६२५०)