खुसखुशीत पालक पुरी

  • पालक १ गड्डि
  • आल अर्धा इंच
  • लसुण ६ ते ७ पाकळ्या
  • कोथिंबीर २ चमचे (ओप्शनल)
  • हिरवी मिरची १ ते २
  • साखर १ चमचा
  • दुध पावडर २ चमचे.
  • चिमुट्भर खायचा सोडा(ऒप्शनल)
  • कणिक आवश्यकते नुसार
  • तळण्यासाठी तेल आवश्यकते नुसार, मीठ चवीनुसार
२० मिनिटे
  • प्रथम पालक ब्लान्च करुन घ्या.

पालक ब्लान्च करणे: - पालक स्वच्छ धुऊन मोठा चिरुन घ्या. आता गॅस वर पातेल्यात थोडॅसे पाणि गरम करायला ठेवा. उकळी आल्यावर पालक व  चिमुट सोडा घालुन २ ते ३ मिनिटे झाल्यावर लगेचच पालक चाळणिवर गाळुन घ्या.. व ताबड्तोप गरम पालक वर गार पाणी ओता त्यामुळे पालकाचा रंग हिरवागार रहातो.

  1. ब्लान्च केलेला पालक + आलं + लसूण + मिरच्या + कोथिंबीर + मीठ + साखर + मिल्क पावडर (दुध पावडर) मिक्सर मध्ये वाटुन घ्या. छान पेस्ट करा.
  2. आता यात मावेल एवढी कणिक व चमचा दोन चमचे तेल घालुन घट्ट कणिक मळा.
  3. या पिठाच्या गोल पुरी लाटुन गरम तेलात तळुन गरमा गरम खा.

हिरव्या रंगाच्या या खुसखुशित पुरी लहान मोठे दोघेहि आवडीने खातात. 

हि पुरी नुसती खायला मस्त लागते बरोबर काही तोंडी लावायची आवश्यकता नाहि.

  • दुध पावडर पुरी ची चव वाढविते.
  • पालक ब्लान्च केल्याने पालकाचा अडुक स्वाद कमी तर होतोच पालकाचा रंग हि हिरवा राहतो.
  • साखरे मुळे पुरीला गोड्सर चव येतेच अजुन पुरी खुसखुशीतहि लागते.
  • साध्या पुरी करतानाही कणकेत साखर व थोडॅ दुध जरुर टाकुन पहा पुरि स्वादिष्ट होते.

माझी माय......आई