झणझणीत हिरवा मसाल्याचा पॉपलेट

  • १ आखा पॉपलेट किंवा कापरी
  • १ कप पुदिना व कोथिंबिर
  • ४ हिरव्या मिरच्या
  • २० ग्रम आलं
  • २ चमचे लसुण पेस्ट
  • १ चमचा गरम मसाला
  • मिठ चविनुसार
  • लिंबु रस
  • तेल आवश्यकते नुसार.
४५ मिनिटे
माझ्या सारखी एक जणच फस्त करेल.... :)
  1. पॉपलेट ज्वारीच्या पिठाने स्वच्छ धुऊन घ्या.
  2. माशाच्या दोन्ही बाजूस तिरकस आडवे सुरीने चिरे पाडून घ्या. 
  3. त्यावर थोडंसं मीठ व लिंबाचा रस चोळून मॅरिनेट करा साधारण अर्धा तास.
  4. आता हिरवा मसाला तयार करूया : पुदिन्याची पाने + कोथिंबीर + हिरवी मिरची + मीठ व आलं ची मिक्सर मध्ये चटणी वाटून घ्या.
  5. एका बाऊला मध्ये लसूण पेस्ट घेऊन त्यात हि वाटलेली चटणी व १ चमचा पावडर गरम मसाला (लवंग+दालचिनी+हिरवी वेलची) असलेला. तसेच लिंबू रस घालून छान मिक्स करा.
  6. हा मसाला मॅरिनेट माशाला वरून व चिरांच्या आतून चांगलाच पेरा. परत ५ मिनिटे बाजूला ठेवा.
  7. आता शक्य तो नॉनस्टिक पॅन वर तेल टाकून मासा छान तळून घ्या. प्रथम तव्यावर मासा टाकल्या वर लगेचच उलटा अलगद पणे.
  8. मग मोठ्या विस्तवावर दुसरं बाजूने रंग द्यावा. वर परत उरलेली चटणी लावा आता पालटून दुसरे बाजूने लावा.. मधून मधून तव्यावर तेल सोडत राहा. आता मंद विस्तवावर मासा ५ ते ७ मिनिटे शिजवा.
गरमा गरम ताव मारा.... आवडतं असल्यास लिंबू पिळून खा.

  • ओवन मध्ये ग्रिल हि करू शकता.
  • ज्यांना तळलेला मासा आवडतं नसेल किंवा तळलेलं खायची बंदी असेल....ते लोक हा मासा तळण्या ऐवजी. केळीच्या पानात लपेटून वाफवू शकता. केळीच्या पानात वाफवालेच स्वाद छान येतो.
  • कमी तिखट खाणारेंनी चटणी वाटताना हिरवी मिरची कमी टाका. तसेच गरम मसाला १ च्या ऐवजी १/२ चमचाच टाका.
  • हवे असल्यास(आवडत असल्यास) ओला नारळाचा चव हि वाटण करताना तुम्ही वापरू शकता... मला नारळ न घालताच आवडते. एकदम झणझणीत.

मिडिया