... फार झाले.

बाहेर भेटू, म्हणाली,  फार झाले!
हे स्वप्न नाही म्हणाली, फार झाले!

आलाच तो श्वास कानी गंधलेला
"आहेस ठोंब्या" म्हणाली, फार झाले!

आली मला तीच भेटाया त्वरेने
"आहेस माझा" म्हणाली, फार झाले!

हे प्रेम की वासना नाही कळाले
"वा! रे शहाणा" म्हणाली, फार झाले!

मी शेवटी तो दिला होकार माझा
"आहेस वेडा" म्हणाली, फार झाले!

ताब्यात ना हालचाली आज माझ्या
"घे हात हाती " म्हणाली, फार झाले!