पराक्रमी असा मी : हझल
माझ्या मनात नाही, कसलाच भेद येतो
पोटात भूक त्याच्या, जेवून मीच घेतो
ना लोभ,मोह,माया, नाहीच लालसाही
उष्टे,जुने-पुराने वाटून दान देतो
त्याच्या खुजेपणावर, त्यानेच मात केली
टुणकण उडून गजरा, वेणीत खोचते तो
आधार लेखनीला खंबीर मेज आहे
सोडून मेज केवळ खुर्चीस का लढे तो?
प्रेमात सावलीच्या सुर्यास पारखा मी
अंधार ही अताशा संगे मलाच नेतो
उद्रेक धूर्ततेचा आता अपार झाला,
तो लावतो शिडी अन, उंटीण चुंबते तो
ना साम्यवाद रुजला, नाही समाजवादी
तो धन्यवाद केवळ पंजास आवडे तो
ते गाडगिळ असो वा, अथवा टिळक, मुटे ते
नावात एक धागा का अभय आढळे तो?
गंगाधर मुटे
...................................................