" फुटके नशीब"
सामान्य जनतेला बसत आहे महागाईचे चटके।
सरकार निवांत पिटा बसले आहे पेयाचे घुटके॥ध्रु॥
खोटेच नफ्या तोट्याचे हे गणित मांडत राहतात।
व्यापाऱ्याना सवलती देऊन आपलेच घर भरतात॥
लुटुपुटूचे लोकसभेत हो उडतात मग खटके॥ध्रु॥१॥
गोदामात सर्वकडे विदेशी माल भरतात।
आपले धान्य मात्र रस्त्यात सडत राहतात॥
हे खातात घरी लोणी जनतेचे मात्र नशीब फुटके॥ध्रु॥२॥
अनंत खोंडे.
४।८।२०१०.