असं वाटलस नाही....
फुलांसारख आयुष्य जगतांना
मला कधी असं वाटलस नाही.
आयुष्याचा महासागर
मी एकटाच पोहून जाईल.
नदीकाठी असलेल्या व्रुक्षाला
असं कधी वाटलस नाही.
की नदीला आलेल्या पुराने
त्याचं अस्तित्व नष्ट होवून जाईल.
पाकळीतून फुललेल्या फुलाला
असं कधी वाटलस नाही.
एक दिवसानंतर त्याच
आकर्षण कमी होवून जाईल.
मधातील पोळींमधील मध गोळा करणाऱ्या
मधमाशीला असं कधी वाटलस नाही.
एक दिवस कुणीतरी
मधाच पोळं चोरून घेवून जाईल.
आयुष्याला पण कधी वाटलस नाही.
एक दिवस आपलं पण
अस्तित्व संपून जाईल.
जितेंद्र गावंडे (९९२२४७६२५०)