तू चुकावे, अन सदा समजून घ्यावे मी?

तू चुकावे अन सदा समजून घ्यावे मी?

हे गनीमांचेच कावे का बघावे मी?
पोचुनी क्षितीजावरी का थांबणे झाले?
उमटलेल्या पावलांना का बघावे मी?
बंद दारे, आणि खिडक्या, अन कवाडे ही...
तूच दे ना वाट, कुठुनी आत यावे मी?
रातराणीच्या कळीला, रात्र का येण्या हवी?
प्रश्न आहे मोगऱ्याचा, (का फुलावे मी? )
पेच आहे चालण्या, वा थांबण्याचा हा...
ह्या प्रवासालाच का ना पांघरावे मी?
-- बहर.