हापुस

काल हापूस बघितला. हापूस आंबा कसा असतो हे चाखायला मिळालाच नाही. विदर्भात हापूस मिळणे दुर्मिळ अन त्यात तो महाग  

असो. पण हा हापूस एकदम मस्त वाटला. कोंकणातील गुरव कुटुंबातील अण्णा पत्रिका पाहून सगळ्या गोष्टी करतात, जे मुलाला पटत नाही. तो हापुसची नवीन जात काढतो आणि ती स्वतः बाजारात विकायची ठरवतो, पण अण्णांना ते पत्रिकेनुसार (व्यवसाय करणे) हे गुरव कुटुंबाचे काम नसते. त्यांच्या मते व्याप्याराला (छाजड शेठ) आंबा विकून आपण मोकळे व्हावे. त्यामुळे अण्णा आणि त्यांचा मुलगा (अजित) यांच्यातला संघर्ष वाढतो. या दरम्यान आंबेजोगाईहून आलेला एक शिक्षक (काळे) शक्कल लढवतो अन ...... पुढे चित्रपट बघण्यात मजा आहे.

अण्णा - शिवाजी साटम

अजित - सुबोध भावे

काळे मास्तर - मकरंद अनासपुरे

सदा - पुष्कर श्रोत्री

यांच्या भूमिका एकदम चपखल झालेल्या आहेत. मधुरा वेलणकरानेही अण्णांच्या मुलींचे (  )काम मस्त केले आहे. आजीच्या भूमिकेत सुलभा देशपांडे आहे.

व्यावसायिक चित्रपटात 'एक चांगला' चित्रपट म्हणून या चित्रपटाचं नाव घेता येईल. उगाच हिंदी-छाप किंवा बाजारू प्रकारचा हा चित्रपट नाही हे नक्की. विनोद असला तरी पीजे नाही. सहज सुंदर आणि मनोरंजकतेसोबत एक संदेश (मराठी ? ) देणारा चित्रपट सहकुटुंब बघाच ...

विजय