मोडावलेल्या मुगाची उसळ

  • मोड आलेले मूग पाव किलो (किमान दीड पेर मोड आणावेत)
  • लसूण वीस पाकळ्या
  • हिरव्या मिरच्या (बोटभर लांबीच्या) सहा
  • कोकोनट मिल्क पावडर शंभर ग्रॅम
  • संडे मसाला दोन चमचे (नसता, गरम मसाला)
  • कोथिंबीर
  • तेल
  • फोडणीचे साहित्य
४५ मिनिटे
दोन जणांसाठी

कोकोनट मिल्क पावडर साधारण ४०० मिली कोमट पाण्यात विरघळवून घ्यावी. गुठळ्या राहू देऊ नयेत.
लसूण ठेचून घ्यावी. मिरच्या पेर लांबीच्या कापाव्यात.
तेल तापवावे. धुरावल्यावर ज्योत बारीक करून मोहरी, जिरे, हळद, मेथी, ठेचलेली लसूण आणि मिरच्यांचे तुकडे घालून ज्योत मोठी करावी. नीट हलवावे.
खाली लागायला लागले आहे असे वाटल्याबरोबर ज्योत बारीक करावी आणि मोडावलेले मूग घालावेत. पटापट हलवावे.
ज्योत मोठी करून मीठ आणि संडे/गरम मसाला घालून सारखे करावे.
चटचटायला लागल्यावर ज्योत बारीक करून नारळाचे दूध घालावे, नीट ढवळून पाच मिनिटे झाकण ठेवावे.
झाकण काढून दहा मिनिटे आळू द्यावे.
मग ज्योत बंद करून बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.

अधिक टीप काहीही नाही.