घाव ते सारे, मी कधी ना अडवले
भाव ते सारे, मी कधी ना अडवले
मी शिडाची माझ्या, दिशा नीट केली
धावते वारे, मी कधी ना अडवले
पूल ना भिंती बांधल्या तू कशाला?
आव ते सारे, मी कधी ना अडवले
आवडाया मी लागलो आज तूला
नाव ते न्यारे, मी कधी ना अडवले
शोधण्या मोती, खोलले शिंपले मी
ठाव ते सारे, मी कधी ना अडवले