शोध

एक-एक गड अवघड ,सर् करत चाललोय 
कळत नाही मी जिंकत कि हारत चाललोय
चमक यशाची भावली या डोळ्यास माझ्या 
माझ्यातल्या 'मी' ला मीच कुस्करत चाललोय?
साद देते वाटते कधी ज्या वाटेवरून चाललो 
बेधुंद तेंव्हाचा तो-मी आता सावरत चाललोय 
डुंबने ध्यासात ज्या भावले जे मनातुनी 
कोंडतो श्वास म्हणून वर-वर तरत चाललोय 
काळासवे बदलत्या मीही शिकलो गणित पक्के
दिल्या घेतल्याच सारा हिशोब करत चाललोय 
बोध होणार कधी मज ,संपेल कधी हा शोध?
कळत नाही जगत कि मी मरत चाललोय