श्रावण

श्रावण

क्षणात उन्ह क्षणात पाऊस, खेळ हा निराळा
नभांगनी होळीचा, रंग कोणी हो उधळीला?
पांढऱ्या संगे काळा कापुस आकाशी पिंजला
आला श्रावण आला, आला  श्रावण आला....... ॥ १ ॥

पावसाचे थेंब ही आता, हिरव्या पानांवर थांबले
दिवसाही उजेडात, हिरे कसे का चमकले?
सप्तरंगी धागा त्यानी आकाशी बांधला
आला श्रावण आला, आला श्रावण आला........ ॥ २ ॥

अंगणातला अपूल्या, पारजात बहरला
धरतीवर तारकांचा, सडा कोणी हो शिंपीला?
कुसुमांचा सुगंध, दाहीदिशा दरवळला
आला श्रावण आला, आला श्रावण आला........ ॥ ३ ॥

वसुंधरा थाटाने, हिरवा शालू  ही नेसली
जशी नववधू पहिल्यांदा, माहेरी चालली
रानी वनी आनंदाने, मोर नाचू लागला
आला श्रावण आला, आला श्रावण आला......... ॥ ४ ॥

प्रतिक्रिया अपेक्षित