'' धर्म ''
संपले जीवन कळाला धर्म नाही
हेच तर माझ्या सुखाचे मर्म नाही ?
आरती अन वंदनाही सारखी मज
गर्व वाटे सांगताना , शर्म नाही
धर्मवेडा लोक म्हणती टोचुनी पण
घाव केले ज्या स्थळी ते वर्म नाही
धर्म मार्तंडा पहावे झाकुनी तू
सांग तू केले कधी दुष्कर्म नाही ?
नागडा मी जाहलो धम्मा समोरी
का तरी ’ कैलास ’ तू बेशर्म नाही ?
डॉ.कैलास