जैन भेळ/श्रावण भेळ - एक नाव

जैन भेळ/श्रावण भेळ : काही दिवसापूर्वी  बाहेर गेलो असता भेळ खाण्यासाठी एका गाड्यावर थांबलो, श्रावण महिन्यामुळे आई वडिलांसाठी बिना कांद-लसुणाची ची भेळ घायची होती, विक्रेत्याला तसे सांगितल्या वर तो म्हणाला तुम्हाला "जैन भेळ" हवी आहे का? मला ज्या प्रकारची भेळ हवी होती ती त्याने दिली, मी विचार केला हे जैन भेळ नाव का/कसे? बिना कांदा लसुणाची भेळ/पदार्थ तर कोणीही खाऊ शकते मग उगीच धर्म/जात वाचक देण्या पेक्ष मला एक नवीन सूचक शब्द सुचला "श्रावण भेळ". सांगायला तसेच समजायला सोपा.
पाहा तुम्हाला कसा वाटतो ते?

बंड्या...