लोचनी अश्रूंचा लोटला पुर आहे!

लोचनी अश्रूंचा लोटला पुर आहे
शब्द मुखी, ओठापासून दूर आहे

चिडून गप्प राहणे चालते पण
हात हालविण्यात नकारी सुर आहे

वाट भविष्याची तुडवली किती ती
वर्तमानच आता हे किती क्रूर आहे

व्यर्थ लटांबर पुढे चालण्याचे उरी
पाठी राहिला माझाच नूर आहे

चाललो आताशा कीती  हे अनंता
भविष्य नित्य सर्वे अजुनही दूर आहे