आकार

आकार

किलबिलणारी पहाट
अंबर; थवे माळल्या बगळ्यांचे
निळ्या अंतराळात खोल
तरळती विरळ घन मेघांचे

कण बाष्प तयांतिल सुकलेले
विरहातिल सल पण थिजलेले
आकार म्हणून छाया मिरवे
पडघम ओठांतिल विझलेले

सरले गत मळभ गढूळ चिखल
झुळुकेत सुगंध मिसळलेले
गोमयात घर सारवलेले
सारेच नितळ; मन भरलेले

.............  चारवा